फेसबुकवर आणखी नियंत्रण हवे – बहुतांश अमेरिकी नागरिकांचे मत


फेसबुकवर असलेला आपला वैयक्तिक डेटा असुरक्षित असून फेसबुकवर आणखी नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आणखी कठोर पावले उचलावीत, असे बहुतेक अमेरिकी लोकांना वाटते. एका नवीन सर्वेक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे.

स्वतःची खासगी माहिती आपल्या परवानगीवाचून सामायिक करण्यापासून सोशल नेटवर्क आणि तंत्रज्ञानान कंपन्यांना प्रतिबंध करण्यासाठी सरकारने आणखी कठोर नियम आणावेत, असे प्रत्येक 10 पैकी सहा अमेरिकी नागरिकांना वाटते. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट या दोन्ही विचारसरणींच्या लोकांमध्ये हे मत समान असल्याचेही या सर्वेक्षणात आढळले. सीबीएस न्यूज आणि यूगोव्ह या संस्थांनी हे सर्वेक्षण केले.

मात्र तंत्रज्ञान कंपन्यांवर अधिक बंधने आणल्यास त्यांची वाढ आणि प्रयोगशीलता कमी होईल, असे मत सुमारे 40 टक्के लोकांनी व्यक्त केले.

फेसबुकसारख्या कंपन्यांवर आणखी कठोर नियम हवे असले तरीही या सर्वेक्षणातील 80 टक्के उत्तरदात्यांना अलीकडील बाहेर आलेल्या घोटाळ्याबद्दल काहीही आश्चर्य वाटले नाही. सर्वेक्षण केलेल्यांपैकी केवळ 27 टक्के जणांनी या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर फेसबुकवरील आपले गोपनीयता सेटिंग्ज बदलले आहेत तर अंदाजे सात टक्के लोकांनी म्हटले आहे, की त्यांनी आता कमी वैयक्तिक डेटा सामायिक करण्याचे ठरविले आहे., हेही उल्लेखनीय.

केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने 8 कोटी 70 लाख वापरकर्त्यांची माहिती त्यांच्या परवानगीशिवाय मिळविली होती, हे फेसबुकने नुकतेच मान्य केले होते.

Leave a Comment