भाऊ कदमच्या ‘सायकल’चा ट्रेलर रिलीज


वायकॉम१८ मोशन पिक्चर्स ‘आपला मानूस’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता ‘सायकल’ हा पुढील मराठी चित्रपट सादर करण्यासाठी सज्ज झाले असून नुकताच एका हलक्या फुलक्या कथेतून आत्मपरिक्षण करायला लावणारी अशी सायकलची कथा असलेल्या सायकल या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कोकणातील एका छोट्या गावात सायकल चित्रपट तुम्हाला घेऊन जातो.

सायकल हा चित्रपट कॉफी आणि बरंच काही, अँड जरा हटके आणि हंपीसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी त्यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली चित्रित केला आहे. हृषिकेश जोशी केशवच्या भूमिकेत आहे, तसेच प्रियदर्शन जाधव आणि भालचंद्र कदम सारखे नामवंत कलाकार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. हा चित्रपट येत्या ४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.