बंद होणार आयफोन एक्स?


अॅपल त्यांचा आयफोन एक्स २०१८ च्या मध्यापर्यंत बंद करेल असा दावा केजीआय सिक्युरिटीचे मिंग ची को यांनी केला आहे. गतवर्षी लेटेस्ट टेक्नोलॉजीचा हा नवा हँडसेट अॅपलने बाजारात आणला मात्र तो बेस्ट सेलिंग फोन बनू शकलेला नाही. अर्थात या फोनचा लिमिटेड स्टॉक बाजारात आला होता आणि उत्पादन अपेक्षेनुसार न झाल्याने त्याची विक्री संथ गतीने सुरु होती.

मिंग याच्या म्हणण्यानुसार हा फोन कंपनी बाजारातून मागे घेण्यामागे चीन हे कारण आहे. चीनी युजरने या फोनला पसंती दिलेली नाही. या आयफोनचा डिस्प्ले चीनी युजरना लहान वाटतो. हा डिस्प्ले ५.८ इंची असला तरी प्रत्यक्ष वापरत ५.५ इंची डिस्प्ले उपलब्ध होतो. त्या तुलनेत आयफोन सिक्स आणि सेव्हनला चीनी युजरची अधिक पसंती आहे. यामुळे हा फोन २०१८ च्या मध्याला बंद केला जाईल. अर्थात तोपर्यंत या फोनची ६२ दशलक्ष युनिट विकली गेलेली असतील. कंपनीला या काळात किमान ८० दशलक्ष युनिट विक्रीची अपेक्षा होती.

भारतातही आयफोन एक्स ला फारसा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामागे फोनची जादा किंमत हे कारण आहे. या फोनची भारतातील सुरवातीची किंमत ८९ हजार रुपये आहे.

Leave a Comment