जगातील हे आहेत सर्वाधिक देखणे पूल


दोन नद्याच नव्हे तर समुद्र जोडू शकतील असे पूल आजकाल जगात सर्वत्र उभारले जात आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे हे बाहुबली काम अनेकपटीने सुलभ केले आहे. मात्र तंत्रज्ञान फारसे प्रगत नसतानाही जगभरात शतकापूर्वी पूल बांधले जात होते आणि त्यातील काही आजही कार्यरत आहेत. हे केवळ नद्या जोडणारे अथवा वाहतूक कोंडी कमी करणारे पूल नाहीत तर ते त्या त्या देशाचे ऐतिहासिक साक्षीदारही बनले आहेत. अश्याच काही देखण्या पुलाची हि माहिती आमच्या वाचकांसाठी

हावडाब्रिज – भारतात कोलकाता येथे ब्रिटीश काळात हुगळी नदीवर उभारला गेलेला हा पूल आजही पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. या पुलाला खाली कुठेही खांब नाहीत. भक्कम वायरच्या सहाय्याने तो सांधला गेला आहे. भारताच्या इतिहासाचा हा साक्षीदार पूल अनेक चित्रपटातून दाखविला गेला आहे. आजही या पुलावरून अव्याहत वर्दळ सुरु असते.


पोन्ट दु गार्ड हा फ्रांस मध्ये १९ व्या शतकात बांधला गेलेला पूल गार्डन नदीवर आहे. रोमन साम्राज्य काळात तो उभारला गेला आणि रोमन लोकांनी बांधलेल्या सर्व पुलात हा उंच आहे. युनेस्कोने जागतिक वारसा यादीत या पुलाचा समावेश केलेला आहे.


टॉवर ब्रिज लंडन- लंडनच्या थेम्स नदीवर बांधला गेलेला हा पूल नवीन तंत्रज्ञानाचे जितेजागते उदाहरण आहे. टॉवर ऑफ लंडन जवळ असलेला हा पूल नदीत उंच आणि मोठ्या आकाराच्या बोटी आल्या तर चक्क मधोमध दुभंगतो आणि बोटी पास झाल्या कि पुन्हा सांधला जातो.


नाम्पू ब्रिज शांघाय- चीनच्या अतिव्यस्त शांघाई शहरात बांधलेला हा पूल म्हणजे छोट्या जागेत किती मोठा पूल बांधता येतो याचा पुरावा आहे. जागेचा पुरेपूर वापर करून आणि स्प्रिंग सारखा अतिशय सुंदर आकार देऊन हा ४२८ मीटर लांबीचा पूल १९९१ मध्ये बांधला गेला आहे. या प्रकारचा जगातला हा ५७ व्या नंबरचा सर्वात मोठा पुल आहे.


टीसिग्मा ब्रिज हाँगकाँग – हा जगातील ९ व्या नंबरचा सर्वाधिक लांबीचा सस्पेन्शन ब्रिज आहे. मणजे हा झुलता पूल आहे. याचे वैशिष्ट म्हणजे या पुलावरून एका बाजूने वाहने जातात तर दुसऱ्या बाजूने चक्क रेल्वे जाते.


सिडनी हार्बर ब्रिज- ऑस्ट्रेलियात सिद्नेय येह्तील ओपेरा हाउस समोर असलेला हा पूल त्याच्या कमानीसाठी प्रसिद्ध आहे. या कमानीमुळे त्याला कोथंजर ब्रिज असेही म्हणतात. सिडनेचा आयकॉनिक स्थळ असलेला पूल १९३२ मध्ये बांधला गेला असून हा जगातील ६ नंबर चा मोठ्या कमानीचा पुल आहे.

Leave a Comment