१२०० वर्षांपूर्वीचे बुद्ध भित्तीचित्र तिबेटमध्ये सापडली


बीजिंग – बुद्धांच्या भित्तीचित्राचा पूर्व तिबेटमध्ये एका पर्वतावर शोध लागला असून सुमारे १२०० वर्षापूर्वीचे ही चित्रे असल्याचा दावा चीनच्या माध्यमांनी केला आहे. बौद्ध कला व स्थानिक इतिहासावर या शोधामुळे आणखी प्रकाश पडू शकतो, असे इतिहासकारांचे मत आहे.

चाग्याब काउंटी येथे सापडण्यात आलेले भित्तीचित्र ही तिबेटच्या टुबो साम्राज्यापूर्वीचे असल्याचे मत तिबेटच्या सांस्कृतिक अवशेष संरक्षण शोध संस्थानच्या संशोधकांनी व्यक्त केले आहे. हे साम्राज्य तिबेटच्या इतिहासातील सर्वात प्रभावशाली मानले जाते. तिबेटीयन संस्कृतीत या कालखंडाचे मोठे योगदान आहे. तिबेटियन नेता सांग्त्सन गैंबो (६१६-९०७ ईसवी) याच्या काळात सामाजिक एकता स्थापन करण्यात आली. ल्हासामध्ये या साम्राज्याची राजधानी होती. चीनच्या माध्यामाने म्हटले आहे, की खोदकाम सुरू असताना सर्वप्रथम मजुरांनी हे बुद्ध भित्तीचित्र पाहिले. ही भित्तीचित्र नवव्या शतकातील असल्याचे इतिहासकारांनी म्हटले आहे.

Leave a Comment