फिजी – एक निवांत मनोहारी देश


जगभरचे पर्यटक नित्यनवीन पर्यटन स्थळांच्या शोधात असतात. रुळलेल्या पर्यंटन स्थळांप्रमाणेच अनटच्ड म्हणजे फारश्या माहिती नसलेल्या अनवट वाटा शोधणारयांची संख्याही कमी नाही. विदेशात जाताना रुळलेल्या वाटांवर जाणे अनेकांची पसंती असते. काहीतरी हटके हवे असलेल्या पर्यटकांनी फिजी या बेटसमूह देशाला एकदा तरी भेट द्यावी. येथील सुंदर जागा अजूनतरी गजबजलेल्या नाहीत. शांतता, रोमान्स, रोमांच असा अनुभव घेण्याची इच्छा असलेल्या भटक्यांसाठी फिजीची भेट अविस्मरणीय ठरेल यात शंका नाही.


फिजी हा देश ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड पासून थोडा दूर द. प्रशांत महासागरात आहे. छोट्या मोठ्या ३२२ बेटांचा मिळून बनलेला हा देश. या देशाच्या लोकसंख्येपैकी ८७ टक्के वस्ती केवळ दोन बेटांवर आहे. विती लेवू आणि वानूआ लेवू अशी त्यांची नावे असून राजधानी गुवा विती लेवू बेटावर आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या देशाला सुंदर किनारपट्टीची जोड मिळाली आहे. मैलोनमैल पसरलेली शांतता मनाला ताजगी देते. विशेष म्हणजे या देशात हिंस्त्र पशु नाहीत, साप, कोळी, कीटक, किडे यांचा उपद्रव नाही. इतकेच काय येथे मलेरियाचे डास नाहीत. नाडी या येथला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.


येथे पोहाण्याची पुरेपूर हाउस भागविता येते तसेच साहसप्रिय लोकांसाठी स्कुबा डायविंग आणि स्नोर्लिंग करण्याच्या चांगल्या सोयी आहेत. रेड या चित्रपट चमकलेली एलिना डिसुझा हिची निवड फिजीची पर्यटन सदिच्छा दूत म्हणून नुकतीच करण्यात आली आहे. या देशात अनेक प्रसिद्ध हिंदू देवळेही आहेत.

भारतीय पर्यटकांची पाउले सध्या या देशाकडे वळू लागली असली तरी भारतातून फिजीला जाण्यासाठी थेट विमानसेवा नाही. जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कोरिया न्यूझीलंड या देश्तून थेट विमानसेवा उपलब्ध आहे.

Leave a Comment