दिल्ली आयआयटी मध्ये देशाची पहिली ५ जी लॅब सुरु


फोर जी नंतर सेल्युलर कम्युनिकेशन टेक्नोलॉजीवर दिल्लीच्या आयआयटी मध्ये मोठ्या प्रमाणावर काम सुरु झाले असून देशातील पहिली ५ जी लॅब येथे सुरु होत आहे. मॅसीव्ह मल्टीपल इनपूत, आउटपूत तंत्रज्ञान म्हणजे एमआयएमओ साठी देशातील ही पहिली रेडीओ लॅब असेल असे आयआयटीचे संचालक प्रो. व्ही. रामगोपाल राव यांनी सांगितले.

५ जी टेक्नोलॉजीसाठी राष्ट्रीय पातळीवर होणारे काम या लॅब मध्ये १३ एप्रिल पासून सुरु होणार आहे. गेली पाच वर्षे त्यासाठी तयारी सुरु होती. येथे उच्च पातळीवरचे ५ जी बेस स्टेशन बनविले जात असून त्यासाठी इंडस्ट्रीची मदत घेतली जात आहे. याच पद्धतीने देशभरात अनेक ठिकाणी ५ जी बेस स्टेशन बनविली जाणार आहेत. २ जी, ३ जी, ४ जी तंत्रज्ञानात संशोधन करण्यात चीनच्या तुलनेत भारताची भूमिका अगदी किरकोळ होती त्यामुळे विदेशी व्हेंडरकडून महागडी उपकरणे मागवावी लागत होती परिणामी टेरिफ दर अधिक लावले जात होते.

नव्या लॅब मुले ही उपकरणे आता भारतातच बनविली जातील आणि त्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागात ब्रॉडबँड स्वस्तात उपलब्ध करण्यासाठी होणार आहे. डिजिटल इंडिया मोहिमेचा हा खरा उद्देश आहे असेही रामगोपाल राव म्हणाले.

Leave a Comment