एकाच झाडावर १८ प्रकारचे आंबे- तरुण शेतकरयाची किमया


शेती थोडे डोके लढवून आणि नवीन प्रयोग करून केली तर ती फायदेशीर कशी ठरू शकते याचे उदाहरण हैद्राबादच्या कृष्णा जिल्ह्यातील २४ वर्षीय तरुण शेतकरी कुप्पाल गोपाला याने घालून दिले आहे. त्याने आंब्याच्या एकाच झाडावर १८ विविध प्रकारचे आंबे आणून दाखविले आणि आसपासच्या परिसरातून हा चमत्कार पाहण्यासाठी एकाच गर्दी उसळली. इतकेच नव्हे तर सरकारनेही कुप्पालची दखल घेतली असून जिल्हाधिकारी स्वतः येऊन आंबे पाहून गेले आणि त्यांनी कुप्पालला नवीन प्रयोगासाठी सर्व सुविधा दिल्या जातील अशी घोषणा केली.

मिळालेल्या माहितीनुसार कुप्पाल याच्या आमराईत २०१५ पासून आंबे उत्पादन घटले होते. अनेक शेतकऱ्यांनी त्याला आता आमराई काढून टाक असा सल्ला दिला मात्र कुप्पालने नवीन प्रयोग करून एकाच झाडावर विविध १८ प्रकारच्या जातीची कलमे केली. प्रयोग पाहून अनेकांनी त्याची चेष्टा केली मात्र कुप्पाल ने प्रयोग थांबविले नाहीत. आणि त्याच्या या कष्टाचे फळ त्याला मिळाले. त्याच्या झाडावर विविध जातीचे १८ प्रकारचे आंबे लगडले आहेत. आता हे नवल पाहण्यासाठी जाणते शेतकरी त्याच्या आमराईला भेट देत आहेत.

उत्तरप्रदेशातील मलिहाबादचे हाजी कलीमुल्ला हे असेच मँगो मॅन म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी त्याच्या बागेत एकाच झाडावर ३०० विविध प्रकारचे आंबे आणून दाखविण्याची किमया केली आहे. त्याच्या या कामगिरीचे कौतुक त्यांना २००८ साली पद्मश्री पुरस्कार देऊन सरकारने केले आहे.

Leave a Comment