शाओमी भारतात उत्पादन प्रकल्प वाढविणार


शाओमीचे उपाध्यक्ष आणि भारतातील प्रमुख मनु जैन यांनी शाओमी भारतात उत्पादन प्रकल्प संख्या वाढवीत असल्याचे सांगितले. ते म्हणाले आमचे दोन प्रकल्प अगोदरच सुरु आहेत त्यात आणखी तीन नवे प्रकल्प सुरु केले जात आहेत. आंध्रातील श्रीसिटी आणि तमिळनाडूतील पेराम्ब्दूर येथे व नोइडा येथे हे प्रकल्प फॉक्सकॉन च्या सहकार्याने सुरु केले जात आहेत. स्मार्टफोन चे तीन नवे कारखाने कंपनी सुरु करते आहे.

नोइडा येथे कमी क्षमतेचा उत्पादन प्रकल्प सुरु होत असून बाकी प्रकल्पातील उत्पादन क्षमता दर सेकंदाला दोन स्मार्टफोन अशी आहे. या प्रकल्पात १० हजाराहून अधिक कामगार आहेत आणि त्यातील ९५ टक्के महिला कामगार आहेत. नवे तीन प्रकल्प सुरु होताच ५० हजार जणांना रोजगार मिळणार आहे. गोल्बल सप्लायर्सचा ५० टक्के हिस्सा शाओमीचा आहे असेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment