डेटा लीकप्रकरणी आपण राजीनामा देणार नाही – मार्क झुकेरबर्ग


वॉशिंग्टन : फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने डेटा लीकप्रकरणी आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच भारत, पाकिस्तान आणि अमेरिकेतील निवडणुकीत डेटा चोरी प्रकरणाच्या तपासासाठी समिती स्थापन केल्याची घोषणाही झुकेरबर्गने केली आहे.

चालू आठवड्यात अमेरिकन काँग्रेससमोर झुकेरबर्ग आपले म्हणणे मांडणार आहे. तो त्यापूर्वी सिनेटर्सची भेट घेण्यासाठी राजधानी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाला. त्याने यापूर्वी अटलांटिक मासिकाला विशेष मुलाखत दिली. त्याने त्या मुलाखतीत राजीनाम्याचे वृत्त फेटाळले. झुकेरबर्ग म्हणाला की, वेगळ्या दृष्टीकोनातून मी काम करतो. पण या प्रकरणी उपस्थित झालेले मुद्दे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.

झुकेरबर्ग पुढे म्हणाला की, आमच्यासमोर फेसबुकच्या स्थापनेपासून १४ वर्षात अनेक अडचणी आल्या. पण त्या सोडवण्याच्या दिशेने आम्ही यशस्वी काम केले. वसतीगृहाच्या एका खोलीत याची सुरुवात झाली. पण त्याची व्याप्ती आज फार मोठी झाली आहे. तेव्हा सद्या उपस्थित प्रश्नावर आम्ही लवकरात लवकर तोडगा काढू.

Leave a Comment