किती कमाई करतात चिअरलीडर्स?


सध्या देशात आयपीएल चा धमाका सुरु आहे. त्यात विविध क्रिकेट टीम मधील खेळाडूच्या कामगिरीवर जसे प्रेक्षकांचे लक्ष्य असते तसेच या सामन्यात चौकार, षटकार अथवा विकेट पडल्यावर नृत्य करणाऱ्या चिअरलीडर्स याही आकर्षणाचा मुख्य भाग असतात. फुटबॉल, रग्बी या खेळांचे ग्लॅमर वाढविण्यात या चिअरगर्ल्सची महत्वाची भूमिका राहिली आहे आणि आता त्या हेच काम क्रिकेटसाठी करत आहेत.

प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या चिअरगर्ल्सची कमाई काय असेल याची अनेकांना उत्सुकता असते. सेलेब्रिटी नेटवर्थ डॉट कॉम साईट वर दिलेल्या माहितीनुसार सर्वात महागड्या चिअरगर्ल्स अमेरिकेतील नॅशनल फुटबॉल लीगमध्ये काम करणाऱ्या आहेत. या पॉप्युलर चिअरगर्ल्स प्रत्येक मॅच साठी ६० ते ९० हजार रुपये घेतात आणि प्रती सिझन त्याची कमाई ५ ते ८ लाख रुपये असते. एका सिझन मध्ये ८ सामने होतात. या कमाईशिवाय बोनस, पार्टी इव्हेंट साठीही त्यांना पैसे दिले जातात. त्या कॅलेंडर गर्ल मॉडेल म्हणूनही काम करतात आणि त्यात टॉप चिअरगर्ल्सना ३० लाखांपर्यंत कमाई होते.

थोड्या कमी लोकप्रिय चिअरगर्ल्स सिझनमध्ये तीन ते चार लाख रुपये कमावतात शिवाय वर्षभर मॉडेलिंग, स्विमसूट कॅलेंडरसाठी फोटो शूट करून बक्कळ पैसा कमावतात. यातील काही इंजिनिअर आहेत काही हेअर ड्रेसर आहेत. मात्र नृत्याची आवड असल्याने त्या या क्षेत्राकडे वळल्या आहेत. अमेरिकन फुटबॉल टीम साठी अॅश्ले, चारो, लीज, पॅट्रीशिया, सिंथिया या लोकप्रिय आणि सर्वात महागड्या चिअरगर्ल्स आहेत.

Leave a Comment