जकार्ताच्या अस्तित्वाला धोका


इंडोनेशियाची राजधानी आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ जकार्ताचा अस्तित्वाला धोका निर्माण झाला असून हे शहर सर्वाधिक वेगाने खचत चाललेले शहर बनले आहे. या शहरातील काही भाग दरवर्षी ९ ते १० इंचांनी खचतो आहे त्यामुळे येत्या काही दशकात या शहराचा मोठा भाग पूर्णपणे खचेल असे मत तज्ञ व्यक्त करत आहेत. सरकारने यावर उपाय म्हणून समुद्राकाठी मोठी भिंत बांधण्यास सुरवात केली असली तरी त्या कामचा वेग अतिशय संथ आहेच पण हे शहर खचण्यामागे वाढलेली समुद्र पातळी हे एकच कारण नाही असे भूगर्भ तज्ञ सांगत आहेत.

या शहरात जमीन खचते आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शहराला पाईपलाईन मधून पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. यामुळे सुमारे १ कोटी जनता खासगी विहिरींचा वापर करते. या विहिरींमुळे जमीन टिकली आहे पण विहिरीत पुन्हा पाणी जमा होणे कठीण होत आहे कारण शहरातील ९७ टक्के रस्ते कॉंक्रीटचे आहेत आणि त्यातून पाणी झिरपून विहिरीत जात नाही. यामुळे विहिरी पुनर्भरण होत नाही. शिवाय पडणारया पावसाचे सारे पाणी समुद्र आणि १३ नद्यांना जाऊन मिळते. परिणामी पावसाचे पाणी वाया जाते. यामुळे जमीन खचण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर अजून तरी कोणतीही उपाय योजना सरकारने आखलेली नाही.

Leave a Comment