तीन बँकांच्या सीईओंच्या बोनसवर रिझर्व्ह बँकेचा लगाम


भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) देशातील तीन मोठ्या खाजगी बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) बोनसवर लगाम लावला आहे. या तिघा जणांच्या बोनसची एकूण रक्कम सहा कोटी रुपयांच्या जवळपास आहे. आर्थिक वर्ष 2016-17 मधील कामगिरीसाठी देण्यात येणार आहे. या बँकांच्या नॉन परफॉर्मिंग अॅसेट्सकडे (एनपीए) लक्ष देऊन आरबीआयने तिन्ही बँकांच्या सीईओंच्या बोनसवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर, एचडीएफसी बँकेचे आदित्य पुरी और अॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा या तीन बँकांच्या सीईओंना बोनस मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. या तिघांच्या प्रस्तावित बोनसच्या कागदपत्रांवर आरबीआयने आतापर्यंत स्वाक्षरी केलेली नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र आरबीआय आणि अन्य बँका या विषयावर काहीही बोलण्यास तयार नाहीत, असे जनसत्ता वृत्तपत्राने म्हटले आहे. या बोनसला 31 मार्च 2018 पर्यंत आरबीआयकडून मंजुरी मिळायला हवी होती, मात्र यात उशिर होत आहे, असे बँकिंगतज्ञ आशुतोष मिश्रा यांचे म्हणणे आहे.

वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआयच्या संचालक मंडळाने सीईओ चंदा कोचर यांच्याकरिता 2.2 कोटी रुपयांच्या बोनसची शिफारस केली होती. अॅक्सिस बँकेच्या शिखा शर्मा यांच्यासाठी ही रक्कम 1.35 कोटी रुपये एवढी होती. एचडीएफसी बँकेच्या आदित्य पुरी 2.9 कोटी रुपये बोनस म्हणून देण्यात येणार आहे.

Leave a Comment