नवी दिल्ली – रेल्वे प्लॅटफॉर्म तसेच रेल्वेत विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून हा निर्णय देशभरातील रेल्वे स्थानकांवर विक्री करण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दरात एकवाक्यता येण्यासाठी घेण्यात आल्याची माहिती केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाच्या सुत्रांनी दिली.
रेल्वेमधील खाद्यपदार्थांवर ५ टक्के जीएसटी
निर्धारित किंमतीपेक्षा जादा दराने काही रेल्वे स्थानकांवर खरेदी केल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. हा निर्णय त्यासाठी घेण्यात आल्याचे समजते. हा बदल भारतीय रेल्वे, भारतीय रेल्वे केटरिंग सव्हिस, त्यांचे परवानाधारक यांसाठी लागू असेल.
आयआरटीसीने वाजवीपेक्षा आधिक दराने खाद्यपदार्थांची विक्री करण्यात आल्याच्या तक्रारीनंतर पीओस मशीनचा वापर सुरू केला होता. पीओस मशीन सध्या प्रायोगित तत्वावर सुरू काही रेल्वे स्थानकांवर वापरल्या जातात. कालांतराने देशातील सर्वच रेल्वेच स्थानकांवर याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.