जगातला सर्वात महागडा परफ्युम – नंबर १.


अतिशय काळजी काट्याने आणि सर्वोत्तम कच्चा माल वापरून बनविले जाणारे परफ्युम म्हणून क्लाईव्ह क्रिस्टीयन परफ्युम ओळखले जातात. यातहि सर्वात महागडा परफ्युम नंबर वन या नावानेच प्रसिद्ध असून तो जगातील सर्वात महागडा परफ्युम आहे. या परफ्युम साठी वापरली गेलेली कुपीही अतिशय नाजूक, देखणी आणि दुर्मिळ मानली जाते.

नंबर वन परफ्युमच्या या असाधारण सुंदर क्रिस्टल कुपीवर २४ कॅरेट सोन्याचे नाजूक जाळीदार काम केले गेले आहे. त्यात हिरे जडविले गेले असून त्यातून सिंहाची आकृती बनविली गेली आहे. या सिंहाच्या डोळ्यांसाठी पिवळे हिरे तर जिभेसाठी दुर्मिळ गुलाबी हिरा वापरला गेला आहे. या बाटलीत ३० मिलीलिटर परफ्युम मावतो आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत आहे १ लाख ४३ हजार पौंड. म्हणजे १ कोटी, ३० लाख ४७ हजार रुपये.

१८७२ साली ब्रिटन मध्ये सुरु झालेल्या या पर्फ्युमरी संस्थेचे संरक्षक क्लाईव्ह क्रिस्टीयान हे एकमेव आहेत ज्यांना राणी व्हिक्टोरियाच्या मुकुटाची प्रतिमा वापरण्याची परवानगी दिली गेली होती.