चंदा कोचर, वेणुगोपाल धूत याच्यासाठी लुकआउट नोटीस जारी


व्हिडीओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेकडून दिल्या गेलेल्या ३२५० कोटी रुपये कर्ज प्रकरणात बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर याच्या अडचणी वाढताना दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंदा, त्यांचे पती दीपक आणि व्हिडीओकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत याच्या विरोधात देशभरातील विमानतळांवर लुकआउट नोटीस जारी केली गेली आहे. यामुळे हे तिघेही न सांगता देशाबाहेर जाऊ शकणार नाहीत. चंदा कोचर यांचे दीर राजीव यांच्याविरोधात सीबीआयने यापूर्वीच अशी नोटीस जारी केली होती. त्यामुळे त्यांना शुक्रवारी विमानतळावर ताब्यात घेऊन त्यांची नऊ तास चौकशी केली गेली होती.

या संदर्भात चंदा याचे पती दीपक यांनी या प्रकरणामुळे पत्नी चंदा याचे तीस वर्षाचे करिअर बरबाद होत असल्याचा आरोप केला आहे. वेणुगोपाल धूत यांनी कोचर यांना एक कंपनी काही लाख रुपयात विकली होती व त्यानंतर धूत यांना एका कंपनीसाठी ३ कोटी कर्ज दिले गेले तसेच २०१२ साली आयसीआयसीआय बँकेने धूत यांना ३२५० कोटी कर्ज दिले. त्यातील २८०० कोटींचे कर्ज एनपीए म्हणजे बुडीत म्हणून घोषित केले गेले असे चंदा कोचर याच्यावर आरोप आहेत.

Leave a Comment