होय, ८ कोटी ७० लाख युझर्सच्या डेटाचा झाला गैरवापर!


नवी दिल्ली: फेसबुकच्या केम्ब्रिज अनालिटिका डेटा स्कँडलमुळे आपला खासगी डेटा सुरक्षित आहे का? हा प्रश्न सध्या जगभर उपस्थित होत आहे. फेसबुकने याबाबत स्वत: स्पष्टीकरण देत, सुमारे ८ कोटी ७० लाख युजर्सची डेटा चोरी झाल्याचे मान्य केले आहे. ज्या युझर्सचा डेटा वापरण्यात आला आहे, त्यातील बहुसंख्य हे अमेरिकेचे नागरिक आहेत.

फेसबुक युजर्सचा खासगी डेटा केम्ब्रिज अनालिटिकाने अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत वापरल्याचा आरोप आहे. फेसबुकचा अधिकारी माईक स्क्रोफरच्या मते, केम्ब्रिज अनालिटिकाने ८ कोटी ७० लाख लोकांचा डेटा चुकीच्या पद्धतीने शेअर केला. यातील बहुसंख्य लोक हे अमेरिकन नागरिक असून सध्या युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी फेसबुक कडक पावले उचलत आहे.

यासाठी प्रायव्हसी टूल्स फेसबुकने आणले आहे. याची घोषणा गेल्या महिन्यात केली होती. शिवाय केंब्रिज अनालिटिकासोबत कोणताही डेटा शेअर झाला असेल, तर त्याची माहिती युझर्सला देऊ, असेही स्क्रोफर म्हणाले.

Leave a Comment