ऑनलाईन डेटिंग प्रोफाईल बनविताना अशी घ्या काळजी


अनेक व्यक्ती डेटिंग करण्यासाठी नित्य नव्या उपलब्ध असणाऱ्या अॅप्सचा वपर करीत असतात. त्यांच्या मते त्यांनी डेटिंग अॅप वर बनविलेली स्वतःची प्रोफाईल अतिशय उत्तम असताना सुद्धा डेटिंग करिता मनासारखे जोडीदार मिळू शकत नाहीत. ह्याचे कारण तुमच्या डेटिंग अॅप वरील प्रोफाईल हे असू शकते. तुमची प्रोफाईल, ती वाचणाऱ्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी कुतूहल, आकर्षण निर्माण करणारी हवी. तुमच्या प्रोफाईलवरून तुमचे व्यक्तित्व कसे असेल ह्याचा अंदाज समोरची व्यक्ती घेत असते. त्यामुळे तुमची प्रोफाईल आकर्षक असेल तर तुम्हाला तुमच्या मनासारखी ‘डेट’ मिळणे शक्य होऊ शकते. म्हणूनच ऑनलाईन डेटिंग प्रोफाईल बनविताना काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे आहे.

प्रोफाईलवर तुमचे छायाचित्र तुमच्या प्रोफाईलसाठी अतिशय महत्वाचे असते. त्यामुळे छायाचित्र लावताना ग्रुप बरोबरचे, किंवा चित्रविचित्र सेल्गी लाऊ नये. तुमचे छायाचित्र तुमच्या खऱ्याखुऱ्या व्यक्तिमत्वाशी मिळते-जुळते हवे. तसेच तुमच्या छायाचित्राच्या ऐवजी कुठल्यातरी अभिनेता-अभिनेत्रींची छायाचित्रे लावणे देखील कटाक्षाने टाळा. प्रोफाईलसाठी तुमचा फुल लेंग्थ, प्रोफेशनल कॅमेऱ्याने घेतलेला फोटो लावणे योग्य आहे. फोटोमध्ये तुमचा चेहरा व्यवस्थित, स्पष्टपणे दिसायला हवा, तसेच हा फोटो सन-ग्लासेस न लावता काढलेला असावा.

आपल्या प्रोफाईल वर आपल्या बद्दलची माहिती जास्त लांबड न लावता, थोडक्या, स्पष्ट शब्दांमध्ये दिलेली असावी. तुमच्या आवडी-निवडी, तुम्हाला अवगत असणाऱ्या कला, यांच्याबद्दल उल्लेख करावा. तसेच केवळ आपल्या व्यवसायाबद्दल किंवा आपण करीत असलेल्या कामाबद्दल माहिती देणे टाळावे. एखाद्या अनोळखी व्यक्तीला ‘डेट’ करण्यासाठी तुम्ही प्रोफाईल बनवित आहात हे लक्षात घेऊन त्या अनुषंगाने योग्य व आवश्यक ती सर्व माहिती स्पष्ट शब्दांमध्ये द्यावी.

तुम्हाला कसा जोडीदार अपेक्षित आहे याबद्दल लिहिताना शब्दांची निवड काळजीपूर्वक करा. तसेच आपल्या संभाव्य ‘डेट’ सोबत चॅट करीत असताना समोरच्या व्यक्तीशी संवेदनशील विषय, उदाहरणार्थ राजकारण, धर्म इत्यादींवर चर्चा करणे टाळावे. तुमच्या गप्पा जितक्या हलक्या फुलक्या , मनमोकळ्या असतील, तितके तुमचे संभाषण रंगेल, आणि परस्परांविषयी रस वाटू लागेल. तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर जी माहिती आणि संभाव्य डेट कशी असावी ह्याबद्दल ज्या अपेक्षा व्यक्त केल्या असतील, त्यांच्या आधारावरच तुम्हाला मेसेजेस मिळत राहतील. त्यामुळे तुमची प्रोफाईल सकारत्मक दिसेल याची काळजी घ्या.

Leave a Comment