आयपीएल दरम्यान जिओ देणार ही सुविधा मोफत


नवी दिल्ली : येत्या ७ एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगला सुरुवात असून भारतातील आयपीएलची क्रेझ पाहता दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने नव्या लाईव्ह मोबाईल गेम आणि क्रिकेट कॉमेडी शोची घोषणा केली आहे.

यासाठी स्पेशल पॅक कंपनीने लाँच केला असून यात जिओ टीव्हीवर २५१ रुपयांत ५१ दिवसांसाठी लाईव्ह मॅच पाहता येणार आहेत. १०२ जीबी डेटा या पॅकमध्ये असून हा लाईव्ह मोबाईल गेम जिओ क्रिकेट प्ले लॉगला देशातील कोणत्याही स्मार्टफोनवर खेळता येणार आहे. ११ भाषांमध्ये ७ आठवडे ६० सामने असतील. कंपनीच्या माहितीनुसार, या गेममध्ये विजेत्यांना मुंबईत घर, २५ कार आणि कोट्यवधी रुपये रोख रकमेची बक्षिसे मिळणार आहेत.

जिओ ‘धन धना धन लाइव’ मायजिओ अॅपवर कॉमेडी शो दाखवला जाईल. जिओ आणि इतर ग्राहकांसाठी हा शो निशुल्क उपलब्ध असणार आहे. ७ एप्रिलला याची सुरुवात होईल. सुनील ग्रोव्हर आणि समीर कोचर या शोचे निवेदन करतील. यात अनेक बड्या व्यक्ती सहभागी होणार आहेत.

Leave a Comment