फ्लिपकार्टला विकत घेण्यासाठी वॉलमार्ट-अॅमेझॉनमध्ये चढाओढ


नवी दिल्ली – लवकरच आपली प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टला ऑनलाईन खरेदी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी अॅमेझॉन खरेदी करण्याची शक्यता वर्तवली जात असून माध्यमांतूनही याबाबत वृत्त येत आहेत. फ्लिपकार्ट सध्या वॉलमार्टशी भागीदारी कराराबाबत चर्चा करत आहे.

भारतातील आपली प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टशी अॅमेझॉनने खरेदीबाबत चर्चा सुरू केली आहे. पण वॉलमार्टशी फ्लिपकार्टचा करार होण्याची जास्त शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार अॅमेझॉनशी फ्लिपकार्टचा करार होण्याची शक्यता कमी आहे. तसेच अशाप्रकारचा कोणताही करार बाजारात एकाधिकारशाही तयार करेल, अशीही काळजी व्यक्त केली जात आहे. कारण अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन कंपन्यांचेच भारतीय बाजारात वर्चस्व आहे.

अॅमेझॉनशी याबाबत वृत्तसंस्थेने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. फ्लिपकार्टचे ४० टक्के समभाग खरेदी करण्याबाबत वॉलमार्ट चर्चा करत आहे. हा वॉलमार्टचा सर्वात मोठा व्यवहार ठरु शकेल, असे वृत्त फेब्रुवारीमध्ये आले होते.

Leave a Comment