संत मंत्री भय्यूजी महाराजांनी केले आहे मॉडेलिंग


मध्यप्रदेश सरकारने राज्यमंत्री म्हणून भय्यूजी महाराज याची नियुक्ती नुकतीच जाहीर केली आहे. त्यामुळे आता महाराज आमदाराला दिले जाणारे वेतन, घरभाडे, गाडी, इंधन खर्च असे अनेक फायदे घेऊ शकणार आहेत. मात्र हे संत आधुनिक संत म्हणून प्रसिद्ध असून त्यांनी यापूर्वी एका कपड्यांच्या ब्रांडसाठी मॉडेलिंग केले आहे हे अनेकांना माहिती नसेल.

भय्यूजी महाराज याचा जन्म १९६८ सालचा असून त्यांचे मूळ नाव उदयसिंग देशमुख असे आहे. ते जमीनदार घराण्यातील आहेत. दत्त धार्मिक ट्रस्टची देखभाल त्याच्याकडे आहे व तेव्हापासून ते संत झाले आहेत. त्यांची पहिली पत्नी मरण पावल्यानंतर वयाच्या ४७व्या वर्षी मुलीच्या आणि आईच्या देखभालीसाठी दुसरा विवाह केला असून त्याची दुसरी पत्नी डॉक्टर आहे. महाराज मर्सिडिस गाड्यांचा वापर करतात तसेच रोलेक्स घड्याळ, अलिशान बंगल्यात वास्तव्य अशी त्यांची राहणी आहे.

अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते तेव्हा केंद्र सरकारने अण्णांशी बोलणी करण्यासाठी दूत म्हणून महाराजांना पाठविले होते आणि अण्णांनी त्याच्या हातून रस पिऊन उपोषण सोडले तेव्हापासून महाराज प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. गुजरात मुख्यमंत्री असताना मोदी यांनी केलेले सद्भावना उपोषण महाराजांच्या हातून ज्यूस घेऊन सोडले होते. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पंतप्रधान मोदी, शरद पवार, लता मंगेशकर, आशा भोसले, उद्धव आणि राज ठाकरे अश्या अनेक नामवंतानी महाराजांच्या इंदोर येथील आश्रमाला भेट दिलेली आहे.

Leave a Comment