अतिप्राचीन मार्तंड मंदिरात आजही भक्तांची गर्दी


निसर्गरम्य काश्मीरच्या अनंतनाग येथून ५ किमी वर असेलेले अतिप्राचीन मार्तंड मंदिर हे सूर्यमंदिर आता भग्नावस्थेत असले तरी अजूनही येथे मोठ्या संखेने सुर्य्पुजक भाविकांची गर्दी असते. इतिहासकारांच्या मते हे मंदिर ७ किंवा ८ व्या शतकातले आहे. सूर्यवंशी राजा ललितादित्य याने ते एका पठारावर बांधले होते. येथून आसपासच्या काश्मीर खोऱ्याचे निसर्गसौंदर्य न्याहाळता येते.

या मंदिराचे बांधकाम चुनखडी दगडात केले गेले असुन त्याला २२० फुट उंचीचे ८४ स्तंभ आहेत. हे स्तंभ १४२ फुट रुंदीचे असून स्थापत्य कलेचा हा अजोड नमुना मनाला जातो. १५ व्या शतकात या मंदिराची सिकंदर बश्शिकाल याने मोडतोड केली. आज येथील खांबाची उंची २० फुट राहिली आहे. हे सूर्यमंदिर असल्याने मुख्य मूर्ती सूर्याची असली तरी भोवती विष्णू, गंगा, यमुना यांच्या मूर्ती आहेत.

असे सांगतात कि राजा लिलीतादित्य पहिल्या सूर्यकिरणला मंदिरात येऊन पूजा करत असे आणि मगच रोजच्या कामांची सुरवात करत असे. अनेक वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा हे मंदिर मंत्रघोषाने निनादात असून येथे येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढते आहे. सभोवार असलेल्या बर्फाच्छादित पर्वत रांगांच्या पार्श्वभूमीवर हे भग्न मंदिर अधिकच देखणे दिसते.

Leave a Comment