शाओमीचा शार्क गेमिंग स्मार्टफोन १३ एप्रिलला लाँच होणार


मोबाईल गेमिंग प्रेमीना लक्षात घेऊन खास डिझाईनचा स्मार्टफोन चीनी कंपनी शाओमी शार्क गेमिंग नावाने चीनमध्ये १३ एप्रिलला लाँच करणार आहे. हा फोन mi लोगोसह नसेल असे समजते. वायबोवर लिक झालेल्या फोटोत या फोनमध्ये ब्लॅक शार्क डिझाईन दिसते आहे. या फोनचा लाँचिंग मधून शाओमीने नवीन गेमिंग डिव्हायसेस बाजारात आणणार असल्याचे संकेत दिले आहेत.

गेमिंगसाठी सोयीचे असेल असे या फोनचे डिझाईन आहे. टॉप आणि बॉटमला प्ले स्टेशन टाईप बटण दिली गेली आहेत शिवज क्लीकेबल दोन बटण उजवीकडे आहेत. यामुळे युजरच्या अंगठ्याच्या रेंजमध्ये हि सर्व बटणे येत आहेत. हा फोन स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसरसह आणि ८ जीबी रॅम, अँड्रोईड ८.० ओरिओसह आहे. फुल एचडी डिस्प्ले, ३२, ६४ व १२८ जीबी स्टोरेज, १२ एमपीचा ड्युअल रिअर कॅमेरा, ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, क्विकचार्ज ४ प्लस तंत्रज्ञानाने युक्त ४ हजार एएमएच बॅटरी अशी त्याची अन्य फीचर्स आहेत. या फोनचा किमतीचा खुलासा करण्यात आलेला नाही.

Leave a Comment