संकटातून बाहेर पडण्यासाठी फेसबुकला लागणार ‘काही वर्षे’


वापरकर्त्यांची खासगी माहिती चोरल्याच्या आरोपावरून संकटात सापडलेल्या फेसबुकला या संकटातून बाहेर पडण्यासाठी आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे, असे कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांने म्हटले आहे.

वॉक्स या संकेतस्थळाशी बोलताना झुकरबर्गने कंपनीच्या व्यवसाय मॉडेलचे जोरदार समर्थन केले. तसेच गेल्या आठवड्यात अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी केलेल्या टिकेलाही प्रत्युत्तर दिले. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी मोहीमशी निगडीत एका राजकीय कंपनीद्वारे पाच कोटींहून अधिक वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करण्याच्या आरोपावरून फेसबुक सध्या वादग्रस्त ठरले आहे. त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी झुकेरबर्गने दिलेल्या मुलाखतींपैकी ही एक मुलाखत आहे.

“फेसबुकच्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे ते खूप आदर्शवादी असून लोकांना एकमेकांना जोडण्यासाठी सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करते. आम्ही साधनांचा नकारात्मक वापर करून गुंतवणूक करण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी वेळ खर्च केलेला नाही,” असे मार्क म्हणाला.

“आम्ही या खड्ड्यातून बाहेर पडू, परंतु त्यासाठी काही वर्षे लागतील, असे मला वाटते. या सर्व प्रश्नांना तीन महिन्यांपासून किंवा सहा महिन्यांत सोडवू शकतो, असे मला वाटते. परंतु काही प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी दीर्घ कालावधी लागेल,” असेही त्याने सांगितले.

Leave a Comment