चायनामध्ये बनविलेल्या ह्या बाऊलची किंमत तब्बल दोन अरब रुपये..!


चायनीज वस्तू म्हटल्या की स्वस्त आणि थोडक्या काळापर्यंत टिकणाऱ्या असा त्यांचा लौकिक आहे. पण ह्याच चायना मध्ये बनविली गेलेली एक वस्तू कोट्यवधी रुपयांच्या किंमतीची असू शकते यावर तुमचा विश्वास बसेल? पण अलीकडेच चीनमध्ये बनविल्या गेलेला बोन चायनाचा एक बाऊल तबल दोन अरब रुपयांना विकला गेला. इतक्या भरघोस किमातीला केवळ एक बाऊल विकला गेला याचे आश्चर्य सगळीकडे व्यक्त केले जात आहे.

पण भरमसाट किमात असणारा हा बाऊल सर्वसाधारण बाउल्स सारखा नाही. हा बाऊल चिंग राजघराण्यातला आहे असे म्हटले जाते. हा बाऊल अतिशय दुर्लभ असल्याने त्याला इतकी किंमत मिळाली असल्याचे बोलले जात आहे. एका निलामी मध्ये ह्या बाऊलसाठी ३.०४ कोटी डॉलर्सची बोली लावली गेली. भारतीय चलनामध्ये ही किंमत एक अरब अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे. हा बाऊल चीनचे सम्राट कान्ग्शी यांच्याकरिता बनविला गेला होता. ह्या बाऊलचा व्यास सहा इंच असून, हा बाऊल सम्राट कान्ग्शी अठराव्या शतकामध्ये वापरत असत.

हा बाऊल विकण्यासाठी जेव्हा निलामी केली गेली तेव्हा अवघ्या पाच मिनिटांच्या आतच दोन अरब रुपयांची बोली लाऊन ह्या बाऊलची विक्री झाली. हा बाऊल चीनची पारंपारिक चित्रकला आणि युरोपियन कलेचे अद्भुत मिश्रण समजला जातो. गतवर्षी देखील असाच एक दुर्मिळ बाऊल चीनमध्ये सुमारे अडीच अरब रुपयांना विकला गेला होता. तो बाऊल चीनच्या सॉंग वंशाशी संबंधित असून, एक हजार वर्षे जुना असल्याचे म्हटले जाते. डॉलर्समध्ये ३.७७ कोटी इतकी किंमत ह्या बाऊलसाठी मिळाली होती.

Leave a Comment