या रेस्टोरंटमध्ये झुकझुकगाडीतून सर्व्ह होतात पदार्थ


कोणत्याही रेस्टोरंटमध्ये आपण गेलो आणि खाद्य पदार्थ ऑर्डर केले कि सर्वसाधारणपाने पुरुष, महिला वेटर, रोबो वेटर तर काही ठिकाणी मालक स्वतः ते ग्राहकाना आणून देतात असा आपला अनुभव आहे. मात्र वेटर नसलेले रेस्टोरंट आपण कल्पना करू शकत नाही. अश्या एका आगळ्या रेस्टोरंटचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला आसाम मधील गुवाहाटी येथे जावे लागेल.

या शहरात २ एप्रिल रोजी एक नवे रेस्टोरंट सुरु झाले असून त्याचे व्हिडीओ वेगाने व्हायरल झाले आहेत. या ठिकाणी विशेष अशी झुकझुक गाडी ग्राहकाने मागविलेले खाद्यपदार्थ त्याच्या टेबलवर आणून पोहोचविते. रेसिपीज रेस्टोरंट असे नाव असलेल्या हे हॉटेल संजय देवनाथ याच्या मालकीचे आहे. हे रेस्टोरंट दोनच दिवसात ट्रेन रेस्टोरंट म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे.

संजय सांगतात ते स्वतः खाण्याचे भोक्ते आहेत आणि देशविदेशात त्यांनी भरपूर प्रवास केला आहे. थेथे अनेक पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. त्यांतून त्यांना स्वतःचे रेस्टोरंट सुरु करण्याची कल्पना सुचली. काहीतरी हटकेपण हवे म्हणून येथे छोट्या रेल्वेतून पदार्थ सर्व्ह करण्यास सुरवात केली. त्यासाठी प्रत्येक टेबलपर्यंत पोहोचतील असे छोटे रूळ टाकले गेले आणि छोट्या रेल्वेवर खास ट्रे ठेवले गेले. त्यातून ग्राहकांना पदार्थ दिले जातात. येथे चीनी, जपानी पदार्थही मिळतात.

Leave a Comment