जिओ पेमेंट बँकेचे काम सुरु


टेलिकॉम क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळविल्यानंतर रिलायंस जिओने आता अर्थक्षेत्रात प्रवेश केला असून त्यांच्या जिओ पेमेंट बँकेने बुधवारपासून काम सुरु केले आहे. रिझर्व बँकेने हि माहिती दिली आहे. रिझर्व बँकेकडे पेमेंट बँक सुरु करण्यासाठी ११ अर्ज आले होते त्यात रिलायंस जिओचा समावेश होता. त्यांना ऑगस्ट २०१५ मध्ये पेमेंट बँक स्थापनेला मंजुरी मिळाली होती. त्याची अधिसूचना आता जारी झाली आहे.

या क्षेत्रात भारती एअरटेल नोवेंबर २०१६ मध्ये सर्वप्रथम पेमेंट बँक सुरु केली असून पेटीएमचे संस्थापक विजयशेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँक मे २०१७ मध्ये सुरु केली आहे. फिनो पेमेंट ने गतवर्षी जून मध्ये बँकेचे काम सुरु केले आहे. जिओ पेमेंट बँकेच्या कामकाजाची सुरवात आत्ता झाली असली तरी या सर्व बँकांना जिओकडून तगडी स्पर्धा होणार अशी खात्री व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment