नोकिया नाईनला ट्रिपल रिअर कॅमेरे, ८ जीबी रॅम


एचएमडी ग्लोबलने त्यांचा पुढचा फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया ९ याच वर्षात नोव्हेंबरमध्ये बाजारात आणण्याची तयारी केली असल्याचे फिनिश साईटवर सांगितले गेले आहे. या फोनचा डीटेल्सचा खुलासा या साईटवर केला गेला आहे. त्यानुसार हा फोन ८ जीबी रॅम, २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज सह आणि तीन रिअर कॅमेरयासह येईल.

या फोनला ६.०१ इंची अमोलेद डिस्प्ले कॉर्निंग गोर्रीला ग्लास ५ सह असेल. स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर असेल आणि तो सिरॅमिक ब्लॅक रंगात येईल. या फोनचे १८ कॅरेट गोल्ड फिनिश व्हेरीयंटही कंपनी बाजारात आणणार असल्याचे सांगितले जात आहे. डूअल नॅनो सीम, अँड्राईड ओएस, ट्रिपल रिअर कॅमेरा त्यातील प्रायमरी २१ एमपीचा फ्रंट शुटर एलईडी फ्लॅश सह, ४१एमपी वाईड अँगल लेन्स, सेकंडरी कॅमेरा २० एमपी टेलीफोटो लेन्स सह तर तिसरा ९.७ एमपी मोनोक्रोम सह आहे. फ्रंट कॅमेरा २१ एमपी सह असेल. या फोन ला इनग्लास फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल आणि फास्ट चार्जिंग बॅटरी दिली जाणार आहे.

Leave a Comment