कारचा व्यवसाय म्हणजे नरक – एलोन मस्क


आम जनतेला चंद्रावर पोहोचण्याचे स्वप्न दाखविन्रे आणि इलेक्ट्रिक कार क्षेत्रात अजोड कामगिरी बजावणाऱ्या टेस्लाचे संस्थापक आणि सीईओ एलोन मस्क सध्या वाईट काळातून गुजरत आहेत. कामाच्या असह्य ताणाचा उल्लेख करताना त्यांनी ट्विटरवरून आपले त्रास व्यक्त केले आहेत. कारचा व्यवसाय म्हणजे नरक आहे असे त्यांचे म्हणणे आहे. टेस्लाच्या मॉडेल तीन चे उत्पादन हे त्याच्यासाठी सध्या मोठे आव्हान ठरले आहे. उत्पादन वेळेत होत नाहीये त्यामुळे माझे बिस्तर सध्या कारखान्यात प्रोडक्शन लाईनजवळ आणले असल्याचे ते सांगतात.

मस्क यांनी अश्यावेळी हे ट्वीट केले आहे जेव्हा त्यांचे गुंतवणूकदार टेस्लाच्या पहिल्या तिमाही उत्पादनाचे आकडे जाणून घेण्यास उत्सुक आहेत. कंपनीला अपेक्षेनुसार उत्पादन होणार नाही याची भीती आहे त्यामुळे मस्क यांनी हेड ऑफ इंजिनिअर डॉज फिल्ड कडून हि जबाबदारी स्वतःचा हाती घेतली आहे. ते म्हणतात ग्राहकांची मागणी खूप आणि त्यामानाने उत्पाडांचा वेग कमी यामुळे आमच्यावर दबाव आहे. उत्पादनासाठी गुंतविलेले अब्जावधी रुपये आम्हाला महसुलातून मिळवायला हवेत आणि त्यासाठी उत्पादन वेग वाढायला हवा आहे.

मस्क म्हणतात पुन्हा एकदा मॉडेल एक्स उत्पादनाचे दिवस जगतो आहे. त्यावेळीही उत्पादन वेगाने व्हावे म्हणून मस्क ऑफिसमध्येच रात्र घालावीत असत. आता पुन्हा तीच वेळ आली आहे. कंपनीने दर महिना २५०० कार उत्पादनाचे लक्ष्य ठेवले होते प्रत्यक्षात जेमतेम २ हजार गाड्या तयार होत आहेत.

Leave a Comment