ऑफिसातून रजा न घेता देखील करू शकता प्रवास


अनेक व्यक्तींना सतत नवीन नवीन ठिकाणी फिरायला जाणे आवडते. अनेकांना ठिकाण कुठेलेही असो, प्रवास करायचा या कल्पनेनेच उत्साह वाटू लागतो. निरनिराळी ठिकाणे पहात, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत प्रवास करणे त्यांना खूप आवडते. पण कामातून, डेडलाईन्सच्या धांदलीमधून त्यांना मनासारखा प्रवास करण्यासाठी वेळ मिळत नाही. खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना सुट्ट्या किंवा रजा देखील माफक प्रमाणातच मिळतात. अश्या वेळी कामावरून रजा न घेता देखील प्रवास करता येणे शक्य आहे.

बहुतेक लोक, शनिवार व रविवार ला जोडून सुट्ट्या आल्या, की त्या काळामध्ये फिरायला जाण्याचे बेत नक्की करतात. यंदाच्या वर्षी शनिवार-रविवारला जोडून बऱ्याच सुट्ट्या आल्यामुळे रजा न काढता देखील जवळपास कुठेतरी फिरायला जाणे शक्य होणार आहे. पण बहुतेक लोक याच दरम्यान फिरायला जात असल्यामुळे आपल्या मनासारख्या ठिकाणी फिरयला जाण्याचा निर्णय ऐन वेळी घेतला गेला, तर हॉटेल ची बुकिंग मिळण्यात अडचण येऊ हाकते. त्यामुळे शनिवार-रविवारला जोडून सुट्ट्या कधी येत आहेत हे पाहून आधीच आपल्या भ्रमंतीचे सर्व नियोजन करून ठेवावे.

तुमच्या कामाच्या निमित्ताने जर वर्क ट्रिप्स कराव्या लागणार असतील, आणि तुम्हाला प्रवासाची आवड असेल, तर ह्या वर्क ट्रिप्सची जबाबदारी शक्य असेल तर तुम्ही स्वीकारू शकता. त्या निमित्ताने नवीन ठिकाणी फिरणे ही होईल आणि कामाखेरीज इतर वेळी त्या ठिकाणी भटकंती करता येणे देखील शक्य होईल. त्यामुळे फिरायला जाण्यासाठी निराळी रजा न घेताच तुम्हाला प्रवासाचा आनंद घेता येईल.

जर भटकंतीसाठी रजा घेता येणे शक्य नसेल, तर तुमच्या घराच्या आसपासच्या, तुम्ही न पाहिलेल्या ठिकाणांना भेटी द्या. ही ठिकाणे घराच्या आसपास असल्याने शनिवार-रविवारच्या सुट्टीच्या दरम्यान हा लहानसा प्रवास तुम्ही करून येऊ शकता. तसेच ह्या प्रवासादरम्यान तुमचा अवाजवी जास्त वेळ खर्च होणार नाही, आणि जास्त दमणूकही होणार नाही. त्यामुळे रजा न घेता भ्रमंतीसाठी बाहेर पडायचे असेल, तर फार लांबवर प्रवास न करता देखील हे करता येणे शक्य आहे.

Leave a Comment