गर्भपाताचा धोका उच्च रक्तदाबामुळे वाढतो


न्यूयॉर्क – उच्च रक्तदाब गर्भधारणेपूर्वी असेल तर त्याचा प्रसूतीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, असे नवीन संशोधनातून समोर आले असून संशोधनातून प्रौढांमधील अतिउच्च रक्तदाब हा भविष्यातील हृदयविकार होण्याचे संकेत देणार आहे. तसेच याचा पुनरुत्पादन प्रक्रियेवरही परिणाम होत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे मेरीलॅण्ड येथील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर चाईल्ड हेल्थ अॅण्ड ह्युमन डेव्हलपमेंट (एनआयसीएचडी)मधील ज्येष्ठ लेखिका युनिस केनेडी श्रीवर यांनी म्हटले आहे.

येथील नियतकालिकात उच्च रक्तदाबाविषयी सविस्तर माहिती प्रकाशित करण्यात आली असून प्रसूतीमध्ये उच्च रक्तदाबामुळे समस्या निर्माण होण्याचा धोका १८ टक्क्यांनी वाढू शकतो. तसेच गर्भपात करावा लागण्याची शक्यता वाढते, असे त्यात म्हटले आहे. अशा समस्यांना १ हजार २००हून अधिक महिलांना तोंड द्यावे लागले आहे. त्या आता तिसऱ्यांदा गर्भधारणा करण्याच्या प्रयत्नात त्या असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment