पायांचे तळवे सतत घामेजात असतील, तर करा हे उपाय


उन्हाळ्याचा कडाका आता चांगलाच जाणवू लागला आहे. ह्या काळामध्ये सतत घाम येत राहणे स्वाभाविक आहे. अनेक लोकांना पायाच्या तळव्यांना देखील खूप घाम येतो, आणि मग काही काळाने पावलांमधून दुर्गंधी देखील येऊ लागते. पावलांना सतत घाम येत राहिल्याने, बंद पादत्राणे, किंवा शूज घालणे ह्या व्यक्तींसाठी खूपच अडचणीचे ठरू लागते. तसेच सतत घाम येत राहिल्याने आणि पावले बुटांमध्ये बंद राहिल्याने येणाऱ्या घामामुळे पावलांना इन्फेक्शन होणाचा धोका देखील असतोच. अश्या वेळी काही गोष्टींचा अवलंब करून ही समस्या पुष्कळ अंशी कमी करता येऊ शकेल.

चामडे हे पावलांना थंड ठेवणारे आहे. त्यामुळे ज्यांच्या पावलांना सतत घाम येतो त्यांनी मुलायम चामड्यापासून तयार केल्या गेलेल्या पादत्राणांचा उपयोग करावा. ह्यामुळे पावलांमधून घाम कमी येईल, पावले थंड राहतील, आणि इन्फेक्शनचा धोका देखील पुष्कळ अंशी कमी होईल. अॅथलेटिक सँडल्स किंवा लोफर्स ह्या प्रकारची पादत्राणे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वापरण्यास उत्तम पर्याय ठरू शकतील. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भारी भरकम पादत्राणे वापरणे टाळावे. कारण अश्या पादत्राणांमुळे हवेचे संचरण होत नाही, व त्यामुळे पावलांमधून दुर्गंधी येऊ लागते.

ऑफिसखेरीज इतर ठिकाणी शक्य असल्यास वजनाला हलके फ्लिप-फ्लॉप वापरावेत. तसेच अॅथलेटिक सँडल्स देखील वापरता येऊ शकतात. आजकाल खेळाडू, धावपटू देखील ह्या अॅथलेटिक सँडल्सचा वापर करीत आहेत. हे सँडल अतिशय हवेशीर असून, वजनाला देखील अतिशय हलके आणि पावलांसाठी आरामदायक आहेत. ऑफिसमध्ये फॉर्मल वेअर म्हणून तुम्ही ‘क्लासिक ब्रोग्स’ म्हणजेच जाडसर, मुलायम चामड्याने बनविलेले बूट, किंवा ऑक्सफोर्ड बुटांचा वापर करू शकता.

उन्हाळ्यामध्ये ‘लोफर्स’ हा पादत्राणांचा प्रकार एक उत्तम पर्याय आहे. तुमच्या कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्ही स्टाईल्सला साजेसा दिसणारा हा पादत्राणांचा प्रकार असून हे देखील मुलायम चामड्याचा वापर करून बनविले जातात. सुएड वापरून बनविले गेलेले लोफर्स देखील अतिशय हवेशीर आणि आरामदायक असतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment