या देशात लाच द्यायला आणि घ्यायला परवानगी


पृथ्वीवरील स्वर्ग अशी ओळख असलेल्या, निसर्गसुंदर स्वित्झर्लंड देशाची सफर हे प्रत्येक पर्यटनप्रेमीचे स्वप्न असते. मात्र या देशातील अनेक पद्धती अथवा तऱ्हा बाकी दुनियेतील देशापेक्षा वेगळ्या आहेत हे फार थोड्यांना ठाऊक आहे.


जगभरात सर्वत्र लाच देणे घेणे गुन्हा मानला जात असला तरी स्वित्झर्लंडमध्ये काही बाबीत लाच देण्यास आणि घेण्यास कायदेशीर परवानगी आहे. या देशाला राष्ट्रपती नाही तसेच या देशाला राजधानी नाही. तरीही येथे चार अधिकृत भाषा आहेत. नागरिक संसदेने मान्य केलेला कोणताही कायदा रद्द करू शकतात.या देशात आजवर एकही जातीय हिंसा झालेली नाही.


येथे लष्करी सेवा बंधनकारक असून १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला हि सेवा बजावावी लागते. येथे शस्त्र बाळगणे सोपे आहे कारण त्यासंदर्भातले कायदे अगदीच सौम्य आहेत. रिझर्व आर्मी म्हणजे राखीव लष्करात पुरुष संख्या जास्त आहे आणि त्यामुळे घरात शस्त्रे असतात आणि वेळ पडल्यास ती वापरता येतात. स्वित्झर्लंडमध्ये ८० लाख नागरिक आणि ४० लाख बंदुका आहेत असे आकडेवारी सांगते.


स्वित्झर्लंडमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी आहे. रात्री १० पर्यंतच मद्यपानाला परवानगी आहे. वेगाने कार चालविणे गुन्हा असून त्यासाठी केला जाणारा दंड संबंधीतांच्या कमाईनुसार ठरतो. म्हणजे सर्वसाधारण कमाई करणाऱ्याला १०० युरो तर अब्जाधीशाला १ लाख युरो दंड भरावा लागतो. येथील टेब्लेरोन चॉकलेट खूपच लोकप्रिय असून दरवषी त्याचे ७० लाख बार तयार केले जातात.

Leave a Comment