फिल्डमार्शल माणेकशानी अशी वसूल केली याह्याखान यांची उधारी


भारताचे पहिले फिल्ड मार्शल आणि १९७१च्या भारत पाक युद्धाचे हिरो सॅम माणेकशा याची आज १०४ वी जयंती. ४ एप्रिल १९१४ ला जन्मलेल्या या भारतीय लष्कराच्या सुपुताच्या अनेक आठवणी आणि किस्से आजही सांगितले जातात. लष्करातील सर्वात मोठे फिल्ड मार्शल हे पद मिळविणारे ते पहिले अधिकारी. त्याची एक आठवण नेहमी सांगितली जाते आणि ती पाकिस्तानचे माही राष्ट्रपती याह्याखान याच्याशी संबंधित आहे.

माणेकशा यांना कार आणि मोटरबाईकचा खूप शौक होता. त्यांनी एका ब्रिटीश अधिकाऱ्याकडून एक मोटरसायकल १६०० रुपयात १९४७ साली खरेदी केली होती. त्यावेळी भारताची फाळणी झाली नव्हती. हीच मोटरसायकल त्यावेळी माणेकशा याचे सहकारी असलेल्या याह्याखान यांना आवडली होती मात्र ती विकण्यास त्यावेळी माणेकशा तयार नव्हते. फाळणी झाली तेव्हा याह्याखान यांनी पाकिस्तानांत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा ही मोटरसायकल माणेकशा यांनी याह्याखान यांना १ हजार रुपयात विकली. याह्याखान यांनी पाकिस्तानात गेल्यावर पैसे देतो असे सांगितले पण २४ वर्षे वाट पाहूनही पैसे आलेच नाहीत.


१९७१ ला भारत पाक युद्ध झाले तेव्हा याह्याखान पाकचे राष्ट्रपती होते तर माणेकशा स्थल सेनाध्यक्ष होते. ही लढाई भारताने जिंकली तेव्हा माणेकशा म्हणाले, गेली २४ वर्षे मी याह्याखान याच्याकडून १ हजार रुपयांचा चेक येईल म्हणून वाट पहिली अखेर त्यांनी ही किंमत देश देऊन चुकविली. या युद्धात बांग्ला देश भारतीय लष्कराच्या सहाय्याने पाकिस्तानमधून फुटून स्वतंत्र झाला म्हणून हे उद्गार त्यांनी काढले होते. म्हणजे १९४७ ची उधारी १९७१ ला फिटली होती.

दुसरा किस्सा असाही सांगतात दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी माणेकशा यांची नेमणूक म्यानमार म्हणजे तेव्हाच्या बर्मा मध्ये कॅप्टन म्हणून होती. या युद्धात जपान विरोधात लढताना त्यांना ७ गोळ्या लागल्या आणि ते गंभीर जखमी झाले. डॉक्टरने त्याच्यावर उपचार करण्यास नकार दिला तेव्हा त्याच्या सोबत असलेल्या जवानाने डॉक्टरवर बंदूक रोखून बजावले जीव आहे तोपर्यंत लढ्याचे असे साहेब सांगतात. तेव्हा सायबांवर उपचार कर नाहीतर गोळी घालेन अशी धमकी दिल्यावर डॉक्टरने उपचार सुरु केले व त्यामुळे माणेकशा याचा जीव वाचला होता.

Leave a Comment