ई लिलावातून बीसीसीआय १० हजार कोटी मिळविणार


बीसीसीआयने क्रिकेट सामन्याच्या प्रक्षेपणासाठी प्रथमच ई लिलाव करण्याची प्रक्रिया सुरु केली असून हे लिलाव आज होत आहेत. यात भारतात एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत होणाऱ्या २२ कसोटी, ४५ वनडे आणि ३५ टी २० सामन्याच्या प्रक्षेपणाचे हक्क विकले जाणार आहेत. हे हक्क टीवी आणि डिजिटल टेलीकास्ट साठी आहेत. या साठी फेसबुक, गुगल आणि जिओ स्पर्धेत आहेत असे समजते.

लोढा समितीच्या शिफारसीनुसार प्रथमच ई लिलाव केले जात असून यापूर्वी गुप्त पद्धतीनेच लिलाव केले जात होते. ऑनलाईन लिलावात किमती कुठपर्यंत चढल्या ते समजेल मात्र कुणी किती किंमत लावली हे समजू शकणार नाही. पहिल्या वर्षीच्या सामन्यांसाठी प्रत्येक सामन्याल ४५ कोटी रिझर्व्ह प्राईज आहे त्यात ३५ कोटी टीव्ही हक्कांसाठी तर ८ कोटी डिजिटल साठी आहेत. पुढच्या २ ते ५ वर्षांसाठी टीव्ही साठी प्रती सामना ४० कोटी तर डिजिटल साठी ७ कोटी बेस प्राईज आहे. या लिलावातून बीसीसीआय किमान १० हजार कोटींची कमाई करेल असा अंदाज जाणकार वर्तवित आहेत.

Leave a Comment