वनप्लस सिक्स ८ जीबी रॅमसह येणार


आयफोनसारखा दिसणारा वनप्लस या दमदार फोनचे फोटो नुकतेच लिक झाले असून हा फोन ६ तसेच ८ जीबी रॅम सह येत असल्याची चर्चा आहे. ऑनलाईन लिक नुसार हा स्मार्टफोन वनप्लस ५ टी प्रमाणे फुल एचडी अमोलेड स्क्रीनसह असेल. फोनचा बॅक पॅनलचे डिझाईनही लिक झाले असून त्यात चौकोनी फिंगरप्रिंट सेन्सर, सेंटरमध्ये डूअल रिअर कॅमेरे वुडन फिनिश दिसत आहे. हा फोन जूनपूर्वी लाँच होईल असेही संकेत दिले गेले आहेत.

कंपनीचा हा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा फोन असेल असे समजते. वनप्लस ५ टी ३८ हजार म्हणजे सर्वात महाग होता तर वनप्लस सिक्स ४० हजार रुपयापर्यंत असेल असे सांगितले जात आहे. हा फोन ६ जीबी आणि ८ जीबी अश्या दोन रॅम सह येईल आणि ८ जीबीचे व्हेरीयंट बाजारात क्रांती घडवेल असा दावा केला जात आहे. या फोन ला २५६ जीबी इंटरनल स्टोरेज, १६ एमपीचा फ्रंट आणि १६ व २० एमपीचे डूअल रिअर कॅमेरे दिले जातील असा अंदाज वर्तविला जात आहे.

Leave a Comment