हे आहेत जगातील टॉप-५ श्रीमंत बॉडी बिल्डर


आपली ताकद आणि शानदार लूकमुळे बॉडी बिल्डर नेहमीच चर्चेत असतात, पण फारच कमी वेळा त्यांच्या संपत्तीची चर्चा होते. पैशांच्या बाबतीत साधारणपणे अॅक्टर, सिंगर, आणि अॅथलीट्सना टॉप मानले जाते. पण असे काही बॉडी बिल्डर जगभरात आहेत ते श्रीमंतीच्याबाबतीत कमी नाहीत. २०१८मधील टॉप ५ श्रीमंत बॉडीबिल्डर आणि त्यांच्या संपत्तीबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. द डेली रेकॉर्डस आणि व्हेल्दिगोरिल्ला डॉट कामवरुन ही माहिती घेतली असून या यादीमध्ये हॉलिवुडचा सुपरस्टार आणि सध्याचे अमेरिकन नेते लीडर अर्नोल्ड श्वार्झनेगर सगळ्यात पुढे आहेत.

जगातील टॉप आयकॉन्समध्ये अर्नाल्ड श्वार्झनेगरची गणना होते. या यादीमध्ये ते अव्वल स्थानी आहेत यात काहीच आश्चर्य नाही. टर्मिनेटर प्रिडेटर, कमांडो, टोटल रिकॉल, ट्रू लाइस या सारख्या उत्तम हॉलिवुडपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. अर्नाल्डची ३० कोटी डॉलरची (२००० कोटी) संपत्ती असल्यामुळेच ते जगातील सर्वात श्रीमंत बॉडीबिल्डर आहेत. ते सध्या अमेरिकेतील राजकारणात सक्रिय असून कॅलिफोर्नियाचे ते गव्हर्नर देखील होते.

रिच ग्रास्परी हे अमेरिकेतील निवृत्त व्यावसायिक बॉडीबिल्डर आहेत. ३० वर्षांपासून ते फिटनेस इंडस्ट्रीशी जोडले गेले आहेत जगातील दुस-या क्रमांकाचे ते बॉडी बिल्डर आहेत. गास्परी न्युट्रिशिअन्स नावाने आपले सप्लिमेंट्स मार्केटमध्ये त्यांनी लाॅंच केले होते. २०११मध्ये त्यांना मसल बीच हाॅल आॅफ फेम अवार्ड देखील मिळाला होता. याशिवाय त्यांचा फोटो आयर्न मॅन मॅगझीनच्या कव्हर पेज वर देखील छापला गेला होता. २०१३ मध्ये त्यांना अर्नाल्ड क्लासिक लाईफटाईम अचिव्हमेंट अवार्ड देखील मिळाला होता. त्यांची ९ कोटी डॉलर (५७० कोटी रुपये) संपत्ती आहे.

जे कटलर हे अमेरिकेतील व्यावसायिक बॉडीबिल्डर असून त्यांना मिस्टर ओलंपिया विनरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. हा सन्मान कटर यांनी ४ वेळा मिळवला आहे. ते जगातील तिस-या क्रमांकाचे श्रीमंत बॉडीबिल्डर असून त्यांच्याकडे ३ कोटी डॉलर (२०० कोटी रुपये) एवढी संपत्ती आहे.

द डेली रिकॉर्डसच्या वेबसाईटनुसार पॉल मायकल लेविस्की जगातील चौथे श्रीमंत बॉडीबिल्डर असून आपल्या रेसलिंग करियरसाठी ते जगभरात चर्चेत होते, ट्रिपल एच या नावाने त्यांना ओळखले जाते. त्यांनी १९८८ मध्ये बॉडीबिल्डिंगमध्ये मिस्टर टीनएज न्यु हॅंपशायरचा किताब जिंकून बॉडीबिल्डिंग करियरची सुरवात केली होती. ते जगातील सगळयात यशस्वी डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर्स पैकी एक असून १४ वर्ल्ड चॅंपियनशिप त्यांनी जिंकल्या आहेत. त्यांच्याकडे २.५ कोटी डॉलर (१६२कोटी रुपये) एवढी संपत्ती आहे.

रुनी कोलमॅन हे वेल्थगोरिल्ला डॉट कॉम नुसार जगातील चौथ्या क्रमांकाचे तर द डेली रेकॉर्डच्या यादीमध्ये ते ५ व्या क्रमांकाचे श्रीमंत आहेत. त्यांची संपत्ती १ कोटी डॉलर म्हणजे ६५ कोटी आहे. सतत ८ मिस्टर ऑलंपियाचे किताब कोलमॅन यांनी मिळवले आहेत.

गॅरी स्ट्रायडम हे अमेरिकेतील निवृत्त व्यावसायिक बॉडीबिल्डर बॉडीबिल्डर आहेत. त्यांनी १९९१ आणि १९९२ मध्ये २ डब्ल्यूबीएफ चॅम्पियनशिप मिळवली होती. ते २००६मध्ये शेवटचे स्पर्धेत उतरले होते. कॉम्पिटिशनमध्ये शेवटचा सहभाग घेतला होता. त्यांची संपत्ती ८० लाख डॉलर म्हणजे ५२ कोटी आहे.

Leave a Comment