जिओने करोडो यूजर्सना असे केले एप्रिल फूल


काल एप्रिल फूल डे होता. कुणाच्याही बोलण्यावर या दिवशी संशय घेतला जाऊ शकतो, लोक अनेक वेळा प्रॅंक करतात. रिलायंस जिओने हाच खास दिवस लक्षात ठेवून स्मार्टफोन बॅटरी लाईफचा मुद्दा उठवला होता. कंपनीचे याबद्दल म्हणणे आहे की ते एक प्रॅंक होते. पाच दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जिओने रिलीज केला होता. जिओ ज्यूसच्या फिचर्सना ज्यामध्ये हायलाईट केले होते. यामध्ये म्हटले होते की आता चार्जर आणि पॉवर बॅंकेचा जमाना गेला आता वीजेशिवाय आणि पॉवर बॅंकेशिवाय फोन चार्ज होणार आहे.

हा टीझर पाहून जिओचे हे एखादे बॅटरी सेव्हिंग अॅप असेल असे वाटत होते. या बाबत कंपनीने कोणताच खुलासा न करता टीजर नंतर कमिंग सून असे लिहिले होते. या शिवाय हे सांगितले होते की हे लवकरच लाॅंच केले जाईल. पण ज्यूसच्या नावाने एप्रिल फूल करुन भारताची पहिली एप्रिल फूल करणारी कंपनी जिओ आता ठरली आहे. कंपनीने याद्वारा संदेश दिला आहे की टेक कंपन्यां बोरिंग नसतात. कंपन्यामध्ये काम करणा-या लोकांना सेंस आॅफ ह्युमर कमालीचा असतो. कंपनीने हा टिझर ट्वीट देखील केला होता.

१ एप्रिल २०१८ अशी लाॅंचिगची तारीख जिओच्या टीझरमध्ये दाखवली होती. पण कुणीच या तारखेवर लक्ष नाही दिले. कारण जिओने ज्या गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले होते त्या समस्येमुळे जवळ-जवळ प्रत्येक स्मार्टफोन यूजर हैराण आहेत. यामुळेच जिओने एप्रिल फूल प्रॅंकसाठी बॅटरीच्या मुद्दयाची निवड केली होती.

Leave a Comment