व्यायामाचे प्रमाण खूप कमी किंवा खूप जास्त आहे किंवा नाही हे कसे ठरवाल?


आपली प्रकृती किंवा शरीरास्वास्थ्य ही सतत बदलत राहणारी गोष्ट आहे. शरीर निरोगी, बळकट राहावे यासाठी दैनंदिन जीवनामध्ये व्यायामाची आवश्यकता आहे. व्यायाम अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. पण शरीराला त्याचा लाभ तेव्हाच मिळतो जेव्हा आपण करीत असलेला व्यायाम योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात केला जाईल. चालणे, पाळणे, पोहोणे, योगसाधना, झुम्बा, किक बॉक्सिंग, एरोबिक्स असे किती तरी व्यायामप्रकार सध्या प्रचलनात आहेत. पण हे व्यायामप्रकार करीत असताना किती केले म्हणजे त्याचा आपल्या शरीराला सर्वाधिक लाभ होऊ शकतो या बद्दल अमेरिकन हार्ट असोसिएशन तर्फे काही गाईडलाईन्स देण्यात आल्या आहेत.

आठवड्यातून किमान पाच दिवस अर्धा तास, किंवा एकूण दिडशे मिनिटे, मॉडरेट इंटेन्सीटी वर्कआउट करणे शरीराला उत्तम स्थितीमध्ये ठेवण्यासाठी आवश्यक आहे. पण यामध्ये सर्वसामान्यांना प्रश्न पडतो तो असा, की ‘मॉडरेट इंटेन्सीटी’ म्हणजे नक्की काय? आपण जेव्हा साधारण वेगाने कोणताही व्यायाम करीत असतो, तेव्हा आपल्या हृदयाची गती त्याच्या सामन्य गतीच्या मानाने थोडी वाढते. आपल्याला घामही येऊ लागतो. ज्या वेळी व्यायाम करताना हृदयाची गती थोडीशी वाढते, आणि हलका घाम येतो, पण आपल्याला व्यायाम करताना फारशी मेहनत घ्यावी लागत नाही, असा वर्क आउट लो इंटेन्सीटी, म्हणजे कमी शारीरिक श्रम असणारा म्हणता येईल. उदारणार्थ तीन किलोमीटर प्रति तास चालणे हा लो इंटेन्सीटी वर्क आउट म्हणता येईल.

मॉडरेट इंटेन्सीटी वर्क आउट मध्ये हृदयाच्या वाढलेल्या गती बरोबर श्वासोछ्वासाची गती देखील वाढते. पण श्वास घेण्याची गती वाढली असली तरी तुम्ही व्यवस्थित बोलू शकता, आणि तुम्हाला खूप जास्त दम लागत नाही. साधारण सहा किलोमीटर प्रति तास या वेगाने चालणे ‘मॉडरेट इंटेन्सीटी’ वर्क आउट म्हणता येईल. तसेच घराची स्वच्छता करणे किंवा बागकाम करणे हे देखील मॉडरेट इंटेन्सीटी वर्कआउट्स आहेत.

जॉगिंग, दोरीवरच्या उड्या मारणे, पळणे, सायकलिंग करणे असे व्यायामप्रकार करताना तुमच्या हृदयाची गती वाढलेली असते. या वेळी तुम्ही एकाच दमात चार पाच वाक्य फार तर बोलू शकता. श्वसनाची गती देखील यावेळी अतिशय तीव्र झालेली असते. या वर्क आउटला हाय इंटेन्सीटी वर्क आउट म्हणता येईल. तज्ञांच्या दृष्टीने शरीराच्या आरोग्यासाठी सर्वसाधारण मनुष्याला मॉडरेट इंटेन्सिटी वर्कआउटची गरज आहे. पण प्रत्येक व्यक्तीसाठी ही इंटेन्सीटी निरनिराळी असू शकते. आपल्यासाठी मॉडरेट इंटेन्सीटी ठरवताना, तुम्ही संपूर्ण ‘रेस्ट ‘ स्थितीमध्ये असताना तुमच्या हृदयाची गती किती आहे ते पाहावे, त्यानंतर व्यायाम करताना तुम्ही कितपत श्रम घेऊ शकता ते पाहावे, म्हणजेच हृदयाची गती किती वाढली तरी तुम्ही व्यायाम करू शकता हे पहावे. हृदयाची, तुम्ही हाताळू शकाल इतपत वाढलेली सर्वाधिक गती तुमचा मॅक्सिमम हार्ट रेट असेल. तुमच्या मॅक्सिमम हार्ट रेटच्या सत्तर टक्के इथवर हृदयाची गती वाढविणारा वर्क आउट हा तुमचा मॉडरेट इंटेन्सीटी वर्कआउट आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment