हृदयाच्या आरोग्यासाठी एका दिवसामध्ये किती अंडी खाणे योग्य?


अंडे हा शरीराला सर्वार्थाने पोषण देणारा, आणि सहज उपलब्ध असणारा, बनविण्यास सोपा असा पदार्थ आहे. ह्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी जीवनसत्वे, प्रथिने आणि इतरही अनेक पोषक घटक आहेत. संतुलित आणि पौष्टिक आहारासाठी आपल्या खानपानामध्ये अंड्याचा समावेश करणे चांगला पर्याय आहे. पण ज्या व्यक्तींना हृदयाशी संबंधित काही आजार असतील, किंवा ज्या व्यक्तींचे कोलेस्टेरोल वाढत असेल. त्यांनी अंड्याचे सेवन काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे एका मध्यम आकाराच्या अंड्यामध्ये २०० मिलीग्राम कोलेस्टेरोल असते. म्हणूनच ज्यांचे कोलेस्टेरोलचे प्रमाण वाढत असेल, त्यांनी अंड्याचे सेवन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. एरव्ही अंडी हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम समजली जातात. अंडे खाणे हे हृदयच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आहे असा एक गैरसमज आढळून येतो. पण यामध्ये कोणतेही तथ्य नाही. तसेच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अंडी खाऊ नयेत असा ही एक समज आहे. त्या उलट अंडी ही वर्षाकाठी कोणत्याही ऋतूमध्ये खाण्यास योग्य असल्याचे मत आहारतज्ञ व्यक्त करतात.

अंड्यांच्या सेवनामुळे त्यामध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी अॅसिड्सच्या मदतीने शरीरातील चांगले कोलेस्टेरोल ( गुड कोलेस्टेरोल ) वाढण्यास मदत होते. तसेच यामुळे शरीरातील ट्रायगलीसराइड्सच्या प्रमाणात घट होते. त्यामुळे हृदविकाराचा झटका येण्याचा धोका पुष्कळ अंशी कमी होतो. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील अंड्याचे सेवन अतिशय फायदेशीर आहे. त्यांच्या वाढत्या वयामध्ये त्यांच्या शरीराला अआश्य्क सर्व पोषक घटक अंड्याच्या सेवनाने मिळू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment