संशोधकांनाही उलगडले नाही भीमकुंडाचे रहस्य


भारत भूमी अनेक अद्भुत रहस्यमय ठिकाणांनी भरलेली भूमी मानली जाते. आता विज्ञानाच्या कसोटीवर अनेक रहस्ये उलगडल्याचा दावा केला जात असला तरी अजून अश्या अनेक जागा आहेत ज्यामागाचे रहस्य अत्याधुनिक संशोधनानंतरही उलगडले गेलेले नाही. असेच एक ठिकाण आहे मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील भीमकुंड. या ऐतिहासिक कुंडाची खोली अजून कुणालाही मोजता आलेली नाही. तसेच त्यातील पाण्याचे रहस्यही उलगडलेले नाही.

या कुंडातील पाणी स्वच्छ आहेच पण ते पिण्यालायक आहे. येथील पाण्याची पातळी कधीही कमी होत नाही. या कुंडात कुठून पाणी येते त्याचा उगम कळत नाही. मात्र सर्वात नवलाची गोष्ट अशी कि कुठलेही नैसर्गिक संकट येणार असेल तर या पाण्याची पातळी अचानक वाढते. हे प्रसिद्ध तीर्थस्थान म्हणून ओळखले जाते आणि अनेक साधू संतांची ही तपोभूमी मानली जाते.

या ठिकाणी वैज्ञानिक शोध केंद्र आहे. पाणबुड्यानि अनेकदा या कुंडाची खोली मोजण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा तळ कुणालाच गाठता आलेला नाही. दिसायला अतिसामान्य असलेल्या या कुंडाचे पाणी पंप लावून उपसण्याचा प्रयत्न झाला तरी त्याची पटली घटली नाही. नोइडा तसेच गुजराथेत भूकंप झाले तेव्हा अगोदरच या कुंडातील पाण्याची पातळी वाढली होती. तसेच त्सुनामी आली तेव्हा ही पातळी १५ फुटांनी वाढली होती असे समजते. या कुंडाची पाणी पातळी वाढू लागली कि कोणतेतरी नैसर्गिक संकट येणार असे नक्की समजले जाते.

भारतीय पुराणानुसार पांडव अज्ञातवासात असताना येथे आले तेव्हा भीमाला खूप तहान लागली. जवळ कुठे पाणी नसल्याने भीमाने या जागी त्याच्या गदेचा प्रहार करून खड्डा केला तेथेच हे कुंड तयार झाले आहे.

Leave a Comment