या बजरंगबलीला पागोटे नेसाविण्यासाठी २६ वर्षाची प्रतीक्षा यादी


देशभरात काल महाबली हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. यंदा बऱ्याच वर्षानंतर हनुमान जयंती मार्च महिन्यात आणि शनिवारी आली होती. त्यामुळे या सणाचे वेगळे महत्व होते. मध्यप्रदेशातील मंद्सोर येहते असलेल्या हनुमान मंदिराची एक खास बात यानिमित्ताने तुमच्यासाठी.

या हनुमानाचे भक्त फक्त भारतातच नाहीत तर प्रदेशातही आहते. या हनुमानाला पागोटे नेसाविण्याची प्रथा आहे. अर्थात हे पागोटे नेसाविण्यासाठी नंबर लावला लागतो आणि आत्ताच त्यासाठी प्रतीक्षा यादी आहे. हि यादी २६ वर्षांची आहे. म्हणजे आपण आत्ता नंबर लावला तर आपला नंबर २०४४ साली लागणार. त्यातून तुम्हाला शनिवारीच पागोटे अर्पण करायचे असेल तर त्यासाठी २०४९ सालापर्यंत वाट पहावी लागणार. अगदी बड्या व्यक्तींसाठीहि येथे वेळेत सवलत मिळत नाही. खुद्द मद्न्सोरचे आमदार ही अनेक वर्षे वेटिंग लिस्ट मधेच आहेत.


भारतीयांबरोबर नामवंत विदेशी भक्तही या हनुमानाचे चमत्कार मानतात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा पासून सध्याच्या डोनाल्ड ट्रम्प पर्यत अनेकांच्या विजयासाठी येथे विशेष अनुष्ठाने केली गेली आहेत. ओबामा नेहमीच त्यांच्या सोबत हनुमानाची छोटी मूर्ती ठेवतात हे अनेकांना माहिती आहे.

Leave a Comment