एअर इंडियाच्या खरेदीसाठी कोण कोण उत्सुक?


बुधवारी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील विमान कंपनी एअर इंडियातील सरकारी हिस्सा विकण्यात येणार असल्याची घोषणा केल्यानंतर हा पांढरा हत्ती विकत घेणार कोण असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर लवकरच मिळू शकणार आहे. सरकार ७६ टक्के हिसा विकणार असून त्यासाठी किमान ५ हजार कोटी घालण्याची तयारी असलेली कंपनी शोधावी लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अनेक विदेशी विमान कंपन्यांनी भारतीय विमान कंपन्यांच्या सहकार्याने एअर इंडियासाठी बोली लावण्याची तयारी सुरु केली आहे. त्यात सर्वात आघाडीवर आहे सिंगापोर एअरलाईन्स. त्यांनी भारतात विस्तारा बरोबर यापूर्वीच भागीदारी केली आहे. टाटा सन्सची विस्तारा आणि सिंगापोर एअरलाईन्स एअरइंडियाच्या विक्रीची अधिकृत सुरवात झाली कि बोली लावणार आहेत असे सिंगापोर एअरलाईन्सचे भारतातील प्रमुख डेव्हिड लिन यांनी सांगितले. नियमानुसार सिंगापोर एअरलाईन्स ४९ टक्के हिस्साच खरेदी करू शकेल.

विस्तारा दोन वर्षापूर्वीच या क्षेत्रात आले असून एअर इंडिया हि टाटा सन्स कडून १९४८ साली जेआरडी टाटा यांनी सुरु केलेली कंपनी आहे. ५ वर्षानंतर सरकारने ती ताब्यात घेतली होती. ती पुन्हा आपल्या ताब्यात घेणे हे टाटा ग्रुपसाठी प्रतिष्ठेचे ठरले आहे. त्याचबरोबर कातर एअरवेज भारतीय इंडिगो सह तसेच फ्रेंच, डच, अमेरिकन एअर लाईन्स या लिलावात संयुक्त बोली लावतील असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment