खुशखबर! काझीरंगा अभयारण्यात गेंड्यांच्या संख्येत वाढ


पर्यावरणाच्या दृष्टीने एक चांगली बातमी आली असून काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील (केएनपी) गेंड्यांच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत 12 गेंड्यांची वाढ झाली आहे. अभयारण्यात करण्यात आलेल्या तीन वर्षीय प्राणीगणनेतून ही माहिती समोर आली आहे. केएनपीत आता एकूण 2,413 एक-शिंगी गेंडे झाले आहेत.

आसामच्या वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अभयारण्यात एकूण 1,435 प्रौढ गेंडे असून त्यात 642 नर आणि 793 महिला आहेत. चार ते सहा वर्षे वयोगटातील 471 गेंडे असून 507 पिले आहेत. काझीरंगा अभयारण्यात जगातील एकूण गेंड्यांपैकी दोन तृतीयांश गेंडे असून या अभयारण्याचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांमध्ये केलेला आहे.

ओरांग व्याघ्रप्रकल्प, मानस व्याघ्रप्रकल्प आणि पोबिटोरा वन्यजीव अभयारण्य येथे मिळून आसाममध्ये 2,624 एक-शिंगी गेंडे आहेत, तर पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशभरात गेंड्यांची संख्या 2,909 एवढी आहे.

गेल्या काही वर्षात, काझीरंगातील गेंड्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र गेल्या वर्षी आलेल्या पुरामध्ये आसाममध्ये 311 गेंड्यांसह 361 प्राण्यांचा मृत्यू झाला होता. एका दशकापूर्वी ही संख्या 2048 होती आणि 2012 आणि 2015 दरम्यान ती 2290 ते 2401 एवढी वाढली होती.

Leave a Comment