३० मार्चला साजरा झाला वर्ल्ड इडली डे


शुक्रवारी ट्विटरवर अचानक वर्ल्ड इडली डे ट्रेंड होऊ लागला आणि सुरवातीला तर ३ नंबरवर तो ट्रेंड होत होता त्यावेळी ३० मार्च हा इडली दिवस म्हणून साजरा होत असल्याची माहिती मिळाली. आपल्याला हि माहिती आत्ता मिळाली असली तरी वर्ल्ड इडली डे ३० मार्चला साजरा करण्याची प्रथा २०१५ पासूनच सुरु असल्याचे समजते. कालच्या इडली डेला शशी थरूर यांनी हा डे साजरा केल्याचे सांगत त्यांच्या ब्रेकफास्टचे फोटो शेअर केले.

भारतात इडली हा सर्वाधिक लोकप्रिय ब्रेकफास्ट आहे. त्यामुळे ३० मार्च २०१५ पासून हा दिवस इडली स्वाद सेलेब्रेशन म्हणून साजरा करण्याची पद्धत चेन्नई येथील इनियावन यांनी सुरु केली. त्यादिवशी त्यांनी १३२८ प्रकारच्या इडल्या तयार केली आणि एका टॉप अधिकाऱ्याच्या हातून ४४ किलो वजनाची इडली केक प्रमाणे कापून इडली डे साजरा केला.

हा दिवस अनेकांनी साजरा केला आणि ट्विटरवर विविध प्रकारच्या इडल्यांचे फोटो शेअर करताना कुठे कुठे कुठली इडली खास मिळते ही माहितीही पुरवली आहे.

Leave a Comment