समुद्रात अवतरले सिम्फनी ऑफ सीज


जगातील सर्वात मोठी क्रुझ नौका ३१ मार्चला समुद्रात अवतरण करत असून सिम्फनी ऑफ सीज असे तिचे नाव आहे. हि नौका म्हणजे तरंगते पूर्ण शहर आहे. १ एप्रिल पासून ती तिचा पहिला प्रवास सुरु करत आहे. फ्लोरिडा येथील रॉयल कॅरेबियान क्रुझ लाईन कंपनीची हि नौका एकावेळी ८ हजार प्रवाशांना घेऊन प्रवास करून शकते. हे क्रुझ फ्रांसमध्ये बनविले गेले आहे. रॉयल कॅरेबियान कंपनीचे हे २५ वे जहाज आहे.

या जहाजात अलिशान फॅमिली सूट असून तो दोन मजली आहे. हि १३४६ चौरस फुटांची खोली असून येथे एकावेळी ८ लोक राहू शकतात. प्रत्येकासाठी स्वतंत्र खानसामा, मनोरंजनासाठी हॉकी, पिंगपोंग टेबल, ८५ इंची स्क्रीनचे सिनेमागृह, व्हिडीओ गेम लायब्ररी, कॅसिनो, शॉपिंग मॉल, ८ डेक, ६ बार असून यातील एका बार मध्ये रोबो ड्रिंक सर्व्ह करतो. झिप वायर, आईसरिंग, गोल्फ कोर्स, वॉल क्लायंबिंग, बास्केट बॉल कोर्ट याचाही आनंद प्रवासी लुटू शकतात. तसेच लहान मुलांसाठी समुद्र किनारा थीम वर बनविलेल्या बागेत वाळूचे किल्ले, छोट्या बोटी, शंखशिंपले आहेत.

१०६ वर्षापूर्वी अशीच अलिशान नौका टायटॅनिक पहिल्याच प्रवासासाठी निघाली आणि हिमनगाला धडकल्याने फुटून बुडाली होती. हि नौका ८८३ फुट लांबीची होती तर नवी सिम्फनी ऑफ सीज नौका ११९० फुट लांबीची असून तिचे वजन २.२८ लाख टन आहे. तिची किंमत आहे १३४ कोटी डॉलर्स.

Leave a Comment