बीएमडब्ल्यूने सादर केली पहिली मिनी इलेक्ट्रिक कार


न्यूयॉर्क ऑटो शो २०१८ मध्ये लग्झरी कार निर्माती कंपनी बीएमडब्ल्यूने त्यांची पहिली मिनी कुपर इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. पुढच्या वर्षात लाँच होणाऱ्या या खास कारला तीन दरवाजे आहेत. या क्लासिक मिनी इलेक्ट्रिक कारला रेड पेंट स्कीमच्या फिनिशिंगसह सादर केले गेले.

या कारवर रेसिंग स्ट्रिप्स अश फ्रंटमध्ये चार सहाय्यक लाईट दिले गेले आहेत. हूडवर लेग ब्रांड चिन्हावर पिवळ्या रंगाचा इलेक्ट्रिक बॅज लावला गेला आहे. फुल इलेक्ट्रिक मॉडेल मिनी ३ डोरच्या आधारावर तयार केले गेले असून अजून पॉवर स्पेसीफीकेशन अजून जाहीर केलेली नाहीत. मूळ मिनी मॉडेलला ६० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हि गाडी लाँच केली जात आहे.हि कार ऑक्सफर्डचा मिनी प्लांट मध्येच तयार केली जाणार आहे.

Leave a Comment