जिओ, एअरटेलला टक्कर देणार व्होडाफोनचा ‘हा’ जबरदस्त प्लान


नवी दिल्ली : इतर टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आणि बाजारात आपली पकड अधिक मजबूत करण्यासाठी एकापेक्षा एक असे प्लान लॉन्च करत आहेत. आता आपला एक जबरदस्त प्लान टेलिकॉम कंपनी व्होडाफोनने लॉन्च केला आहे.

६५ रुपयांचा १ जीबी डेटा प्लान एअरटेलने लॉन्च केला आहे. व्होडाफोनने एअरटेलच्या या प्लानला टक्कर देण्यासाठी आपला ३३ रुपयांचा प्लान लॉन्च केला आहे. व्होडाफोन कंपनी ३३ रुपयांच्या या प्लानमध्ये आपल्या ग्राहकांना अनलिमिटेड पॅक उपलब्ध करुन देत आहे.

आपला ३३ रुपयांचा प्लान व्होडाफोनने प्रीपेड ग्राहकांसाठी लॉन्च केला आहे. कंपनीने ३३ रुपयांच्या या प्लानमध्ये युजर्सला ३जी आणि ४जी डेटा उपलब्ध करुन दिला आहे. पण कंपनीने हा प्लान सुपर नाईट प्लानसोबत लॉन्च केला असल्यामुळे या प्लानला सीमा ठेवण्यात आली आहे. या पॅकचा लाभ युजर्स नाईट पॅकच्या सीमेअंतर्गत एका रात्रीत करु शकतात. या डेटा पॅकचा वापर युजर्स रात्री १ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत ४जी स्पीडमध्ये करु शकतात.

Leave a Comment