फेसबुकनंतर ट्रम्प यांचा अमेझॉनला दणका


वॉशिंग्टन : फेसबुकनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ई-कॉमर्स सेगमेंटची सर्वात मोठी कंपनी असणाऱ्या अमेझॉनला आपल्याच देशात जोरदार झटका दिला आहे. अमेझॉनविरुद्ध अमेरिकेत ‘टॅक्स ट्रिटमेंट’ गरजेची असल्याचे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेझॉनची मार्केट व्हॅल्यू डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर काही मिनिटांतच जवळपास ४५ अरब डॉलर (२.९० लाख करोड) घसरली.

सीएबीसीच्या एका रिपोर्टनुसार, आपल्यापेक्षा लहान व्यवसायांना अमेझॉन नुकसानीत ढकलत असल्यामुळे शॉपिंग मॉल्स आणि रिटेलर्सना मोठे नुकसान सोसावे लागत असल्यामुळे अमेझॉनवर नवा टॅक्स लावला जाऊ शकतो. अमेझॉनच्या शेअर्समध्ये झालेली घरसण आणि कंपनीची मार्केट व्हॅल्यू कमी झाल्याने अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या संपत्तीवरही मोठा परिणाम झाला आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम बिलेनिअर इंडिक्सनुसार, त्यांची संपत्ती सध्या जवळपास ३.५ अरब डॉलर्सने (२३ हजार करोड रुपये) घटली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर अद्याप अमेझॉनविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परंतु, यापूर्वीही ट्रेजरी सेक्रेटरी स्टीवन म्युशिन यांनीही अमेझॉनवर सेल्स टॅक्स लावण्याची शिफारस केली होती.

Leave a Comment