सुजुकीने 'या' बाईकच्या किंमतीत केली तब्बल २.२ लाखांची कपात - Majha Paper

सुजुकीने ‘या’ बाईकच्या किंमतीत केली तब्बल २.२ लाखांची कपात


नवी दिल्ली : सुजुकी मोटरसायकल कंपनीने आपल्या गाडीच्या किंमतीत तब्बल २.२ लाख रुपयांची कपात केली आहे. आपल्या GSX-R1000R आणि हायाबुसा यांच्या किंमतीत सुजुकी मोटरसायकल इंडियाने २.२ लाख रुपयांपर्यंत कपात केली आहे. या गाड्यांच्या किमतीत कपात कस्टम ड्युटीत घट झाल्याने करण्यात आली आहे.

आपल्या GSX-R1000R मॉडेलच्या किंमतीत सुजुकी कंपनीने २.२ लाख रुपयांनी कपात केल्यामुळे गाडीची किंमत आता १९.८ लाख रुपये झाली आहे. या गाडीची किंमत यापूर्वी जवळपास २२ लाख रुपये होती. याच प्रमाणे हायाबुसाच्या किंमतीतही १८६२३ रुपयांनी कपात केली आहे. या मॉडेलची किंमत आता १३.५९ लाख रुपये झाली आहे. या मॉडेलची किंमत पूर्वी १३.८७ लाख रुपये एवढी होती.

Leave a Comment